Events

Eye Camp 2015


08/07/15


बारामती, ता. ७- डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांच्या मदतीने बारामतीतील गरजू रुग्णांसाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया संस्थेने दृष्टीदानाची एक वेगळी चळवळ उभी केली आहे, असे गौरवोद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे काढले. फोरमच्या वतीने तसेच राज्य शासनाचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व पुणे जिल्हा अंधत्व निवारण सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराचे आज अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत उदघाटन झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, फोरमच्या प्रमुख सुनेत्रा पवार, आरोग्य उपसंचालक हनुमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवना पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए.एस. देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप, डॉ. मीरा चिंचोलीकर, डॉ. बापू भोई, डॉ. सचिन कोकणे, दिगंबर जैन देवस्थानचे अध्यक्ष वालचंद संघवी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. फोरमने केलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेत पवार यांनी या कामाची प्रशंसा केली. पर्यावरण रक्षणासह आरोग्य, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात या संस्थेच्या वतीने उपक्रम राबविले जातात, व समाजाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो ही बाब स्तुत्य असल्याचे पवार यांनी नमूद केले. समाजातील गरजू रुग्णांसाठी अशी शिबीरे ही वरदान ठरतात त्या मुळे अशी शिबीरे होणे गरजेचे असल्याच प्रतिपादन त्यांनी केले. डॉ. तात्याराव लहाने यांनीही या शिबीराची प्रशंसा करताना येथे येऊन रुग्णांच्या शस्त्रक्रीया करण्याचे वेगळे समाधान असते असे सांगत सुनेत्रा पवार व त्यांच्या टीमचा गौरव केला. प्रास्ताविकात संस्थेच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी फोरमच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. गेल्या पाच वर्षात फोरमने केलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली. या प्रसंगी शिबीरासाठी सहकार्य केलेल्या डॉक्टरांचा पवार यांच्या हस्ते सत्कार केला