Events

Eye Camp august 2016


08/11/16


बारामती- गेल्या पाच वर्षात दोन हजारांवर रुग्णांना दृष्टी बहाल करण्याचे काम एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार व त्यांचे सहकारी करीत आहे, बारामती परिसरात नेत्रचळवळ उभी राहिली असून वयोवृध्दांवर त्या माध्यमातून मोफत होणारे उपचार हे ख-या अर्थाने अनुकरणीय काम आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पुणे जिल्हा परिषद, पुणे जिल्हा अंधत्व नियंत्रण सोसायटी व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने मोफत बिनटाका मोतीबिंदू शिबीराचे उदघाटन आज श्री. मुंडे यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, आरोग्य उपसंचालक एच.एच. चव्हाण, सभापती करण खलाटे, नगराध्यक्ष योगेश जगताप, उपनगराध्यक्षा ज्योती बल्लाळ, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव द.रा. उंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, डॉ. मीरा चिंचोलीकर, डॉ. महेश जगताप, डॉ. बापू भोई, डॉ. सचिन कोकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बारामती तालुक्यात फोरमच्या माध्यमातून द़ृष्टीदोष निवारण वर्ष म्हणून गेल्या काही काळात दोन हजारांवर रुग्णांना नवदृष्टी प्रदान करण्यात आली ही बाब समाजाला दिलासा देणारी आहे. संपूर्णपणे मोफत अशा या शस्त्रक्रीया वयोवृध्दांवर केल्या जातात याचा मुंडे यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आजवर गेल्या तीन चार वर्षात डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी जे प्रचंड सहकार्य केले व बारामती परिसरातील रुग्णांवर शस्त्रक्रीया करुन त्यांना नवीन दृष्टी प्रदान केली त्या बद्दल सुनेत्रा पवार यांनी प्रास्ताविकात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शुक्रवार (ता. 12) व शनिवारी (ता.13) दोन दिवसात पाचशे रुग्णांवर शस्त्रक्रीया करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. लहाने यांनीही बारामतीत येऊन येथील रुग्णांवर शस्त्रक्रीया करताना विशेष आनंद होत असल्याचे नमूद केले. बारामतीत गेले काही वर्षे हा उपक्रम सुनेत्रा पवार यांनी सुरु ठेवला आहे, त्या बद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच येत्या डिसेंबर मध्ये आणखी एक शिबीर आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती फोरमच्या अध्यक्षा सौ.सुनेत्र पवार यांनी दिली. ज्या रूग्णंवर या शिबीरात शस्त्रक्रिया होऊ शकली नाही त्यांच्यावर डिसेंबर मधील शिबीरात शस्त्रक्रिया केली जाईल असे त्या म्हणाल्या.