Events

Eco friendly Ganesh Utsav


09/05/16


एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने दि.31ऑगस्ट 2016 ते 1 सप्टेंबर 2016 या दोन दिवसां दरम्यान बारामती शहरातील एकुण 11 शाळेतील जवळपास 500 हुन अधिक विद्यार्थींना पर्यवरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा व शाडू मूर्ती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षी बारामती शहरात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचे विसर्जन नीरा डावा कालव्यात केले जाते. त्या मुळे कालव्याच्या पाण्याचे मोठ्य प्रमाणावर प्रदूषण होते. हे प्रदूषण टाळण्याच्या उद्देशाने व पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा पवार यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेची संकल्पना मांडली. यासाठी पुणे येथील अभिनव कला महाविद्यालयाचे सतीश काळे, अहमदनगरचे शिल्पकार मुकुंद शेळके, अर्चना शेळके, गणेश मुदीगंटी, भरत गांधले, निवास कण्हेरे यांनी या दरम्यान विद्यार्थांना प्राशिक्षण दिले. दि.31 ऑगस्ट रोजी विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल सीबीएसई, इंग्लिश मिडीयम एसएससी विभाग, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा, विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर, जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, धों. आ. सातव (कारभारी) विद्यालय या ठिकाणी हे प्रशिक्षण दिले गेले. तर दि.1 सप्टेंबर 2016 रोजी छत्रपती शाहू हायस्कूल , आर.एन.अग्रवाल टेक्निकल हायस्कूल ,कवि मोरोपंत शिक्षण संस्था विद्या मंदीर, विद्या प्रतिष्ठान न्यू बालविकास मंदीर पिंपळी,म.ए.सो.हायस्कूल मुलांची शाळा व कन्या विभाग आशा एकूण अकरा शाळेतील विद्यार्थींनी सहभागी होऊन या कार्यशाळेचा लाभ घेतला व एकाच दिवशी अनेक विद्यार्थ्यांनी शाडूच्या मूर्त्या बनविल्या. या प्रशिक्षणातून तयार केलेल्या शाडूच्या मूर्त्यांची प्रतिष्ठा विद्यार्थी करणार असून त्याला पर्यावरणपूरक रंगसंगतीने सजावट करुन आरास देखील इकोफ्रेंडली करणार आहेत. या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांत पर्यावरणाचे महत्व वाढीस लागावे या साठी हा उपक्रम राबविला गेला.