Events

Plastic Awareness program


04/23/17


बारामती, ता. 22- प्लास्टीकची समस्या दिवसोदिवस गंभीर होत चालली आहे.रोज शेकडो टन प्लास्टीकच्या कच-याची निर्मिती प्रत्येक शहरात आपल्याकडुन होत आहे.तो कचरा कसा संपवायचा अथवा त्याची विल्हेवाट कशी वावायची हाच मोठा आणि गंभीर प्रश्न आहे.थोड्याबहुत प्रमाणात त्यावर उपाय शोधण्यात आले आहेत. प्लास्टीक पासुन रस्ते बनवले जात आहेत, काही ठिकाणी बंधारे बांधण्यासाठी  तसेच इंधन बनविण्यासाठी हि प्लास्टीकचा वापर केला जात आहे.  पण खरी गरज आहे ती अशा प्रकारे काम करणा-या प्रकल्पांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याची म्हणुनच जागतिक वसुंधरा दिनानिमित्त एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने असाच एक उपक्रम हाती घेत  प्लास्टिक कच-या पासुन डिझेल बनविणा-या केशवसीता मेमोरियल फौउंडेशन ट्रस्ट संचालित रूद्रा एन्व्हॉर्यमेंन्टल सोलुशन्स (इंडिया) लिमिटेड या कंपनी कडे लोकांकडुन प्लास्टीकचा कचरा गोळा करुन पोहचविण्याचा उपक्रमाचा आरंभ  फोरमच्या प्रमुख सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे हे  केवळ मान्य करून त्यावर काहीही उपाय शोधू शकलो नाही तर पुढच्या अनेक पिढ्या आपल्याला कदापि माफ करणार नाहीत किंबहुना आपण पशू,पक्षी, वसुंधरा आणि एकूणच पर्यावरणासाठी सर्वकाही ज्ञात असूनही,क्षमता असूनही काहीच करू शकलो नाही ही खंत कायम मनाला सतावेल या जाणिवेतून आज माझ्या भविष्याला ,या पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला वाचविण्यासाठी माझ्या कार्याचा थोडा का होईना हातभार लागावा या प्रामाणिक उद्देशातून या समस्येच्या मुळाशी जाण्याचा संकल्प करत फोरम सदस्यांनी स्वत: गेल्या आठवड्यापासुन स्वत:च्या घरातील व परिसरातील  गोळा  केलेला प्लास्टिक कचरा आज  पुर्नप्रक्रिया  करण्यासाठी एकत्र करुन केशवसीता मेमोरियल फौउंडेशन ट्रस्ट संचालित रूद्रा एन्व्हॉर्यमेंन्टल सोलुशन्स (इंडिया) लिमिटेड,जेजुरी या कंपनीच्या प्रतिनिधींना  एक टेम्पो प्लास्टीक  सुपुर्द करण्यात आले. व वसुंधरा दिनी फोरम सदस्यांनी स्वच्छ बारामती निर्माण करण्याचा संकल्प केला. प्लास्टिकची प्रत्येक वस्तू जसे की, दूध व तेलाच्या पिशव्या, तेलाचे डबे,सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या,टूथपेस्ट,औषधाच्या ट्यूब्स,पाण्याच्या व सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या ,शाम्पू व पावडरचे डबे,फिनेल स्प्रे बाटल्या,कपडे धुण्याच्या पावडर पिशव्या,वेफर्स बिस्कीट,ब्रेडचे रॅपर,कॅसेट,सी. डी. कव्हर ,प्लास्टिक खेळणी प्लास्टिकची फुले ,पडदे,कव्हर या आणि यांसारख्या असंख्य वस्तू आपण जाणते ,अजाणतेपणी वापरतो आणि वापरानंतर सहजगत्या आजूबाजूला फेकून देतो आजपासून आपण तसे न करता ते एकत्र गोळा करून ठेवणार आहोत आणि सध्या महिन्यातून दोनवेळा आणि नंतर महिन्यातून चारवेळा हा संपूर्ण प्लास्टिक कचरा एकत्र करून केशवसीता मेमोरियल फौउंडेशन ट्रस्ट संचालित कंपनीकडे देणार आहोत ज्यामध्ये या प्लास्टिकपासून इंधन बनविले जाणार आहे म्हणजेच सर्वाधिक घातक वस्तूपासून उपयुक्त इंधन बनवून आपण आपल्या भविष्याला आणि पुढच्या पिढ्यांना सुरक्षित करणार आहोत त्यामुळे या प्लास्टिक मुक्त चळवळीत प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला तर आपण सर्वजण मिळून स्वच्छ, निर्भेळ आणि शाश्वत सुंदर पर्यावरण निश्चित निर्माण करू शकू त्यासाठी गरज आहे एक छोटा संकल्प करण्याची ,मनापासून निर्धार करण्याची की मी आजपासून माझ्या अवतीभवतीच्या प्लास्टिककडे पुनर्वापरच्या दृष्टीनेच बघेन मी प्लास्टिक टाळू शकत नसलो तरी ते या पृथ्वीवर शिल्लकही ठेवणार नाही हा छोटा संकल्प आपल्या आयुष्यात नक्की सुख घेऊन येईल आज ही फक्त सुरुवात असली तरी या मोहिमेचे अनेक फायदे लक्षात घेता नजीकच्या काळात याला चळवळीचे रूप येणार आणि बारामती प्लास्टिक मुक्त होणार हे मात्र नक्की ... आजची ही छोटी सुरवात भविष्यात बारामतीला प्लास्टिक मुक्तीकडे घेऊन जाणार असल्याचा विश्वास सौ. सुनेत्रा पवार यांनी या प्रसंगी व्यक्त केला.