Events

Project Meghdoot June 2017


06/05/17


💦💧 प्रकल्प मेघदुत 💧💦 एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडीया, बारामती,च्या अध्यक्षा आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या " प्रकल्प मेघदूत " अंतर्गत रविवार दि.४ जुन २०१७ रोजी सायंकाळी ५.०० वाजता बारामती तालुक्यातील- मौजे -सोनवडी- उंडवडी- ब-हामपूर गाव शिवेवरील ओढा खोलीकरण आणि रूंदीकरण कामाचा शुभारंभ फोरमच्या प्रमुख सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी बारामतीचे तहसिलदार श्री.हनुमंत पाटील , पंचायत समितीच्या उप-सभापती सौ.शारदा खराडे, बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.पोर्णिमा तावरे,बारामती तालुका रा.काँ. आध्यक्ष श्री.संभाजी होळकर,रा.काँ.बारामती तालुका युवक अध्यक्ष श्री.राहुल वाबळे,मंडल अधिकारी श्री.M.P.सय्यद,ब-हमपुर गावच्या सरपंच सौ.वनिता गवळी, उपसरपंच श्री.योगश जाधव गावचे ग्रामस्त व फोरम सदस्य उपस्थित होते.