Events

नीरा डावा कालव्याची स्वच्छता


07/09/17


एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने नीरा डावा कालव्याची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. सोमवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने शहरातून वाहणा-या नीरा डावा कालव्याची स्वच्छता करण्याच्या कामाचा काल प्रारंभ झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ झाला. बारामती शहरातून नीरा डावा कालवा वाहतो. या कालव्यामध्ये अनेक वर्षांपासून विविध प्रकारची घाण व गाळ साचला आहे. या कालव्याची स्वच्छता होणे गरजेचे होते. ही बाब विचारात घेऊन फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी हे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. सॅनी या कंपनीने फोरमला लॉंग बूमचे मशीन या कामासाठी दिले आहे. या मशीनच्या सहाय्याने तीन मोरी ते जळोची साठवण तलावापर्यंत कालव्याची स्वच्छता केली जाणार आहे. या गेल्या अनेक वर्षात या कालव्याची स्वच्छता करण्यात आलेली नसल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ साचून राहिलेला आहे. या स्वच्छतेमुळे नीरा डावा कालव्याचा प्रवाह व्यवस्थित वाहण्यास मदत होणार आहे. फोरमच्या वतीने हाती घेण्यात आलेले हे काम प्रशंसनीय असल्याचे अजित पवार यांनी या वेळी सांगितले. दरम्यान नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणासाठीही निधीची तरतूद करण्याचे सूतोवाच या वेळी अजित पवार यांनी केले. या प्रसंगी अजित पवार यांच्या हस्ते सॅनी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक नितीन मोरे, महाराष्ट्राचे सॅनी कंपनीचे वितरक बापू साळुंखे, समन्वयक अविनाश सावंत यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, गटनेते सचिन सातव, मुख्याधिकारी मंगेश चितळे, नगरसेवक सत्यव्रत काळे, सूरज सातव, सुधीर पानसरे, नवनाथ बल्लाळ, अमर धुमाळ, यांच्यासह सिध्दनाथ भोकरे, आरोग्य निरिक्षक सुभाष नारखेडे उपस्थित होते.