Events

Eye camp


08/19/17


बारामती- राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पुणे जिल्हा परिषद, अंधत्व निवारण सोसायटी व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीरात शुक्रवारी पहिल्या दिवशी 231 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रीया करण्यात आल्या. या शिबीराच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही शिबीरास भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले होते. पुणे जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या अनेक रुग्णांवर आज दुस-या दिवशीही शस्त्रक्रीया सुरु होत्या. काल ज्यांच्या शस्त्रक्रीया करण्यात आल्या त्यांना आज शिबीरातून घरी पाठविण्यात आले. या प्रसंगी अनेक रुग्णांनी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख व शिबीराच्या संयोजक सुनेत्रा पवार यांचे आभार व्यक्त केले. घरी जाण्यापूवी डॉ. लहाने यांनी त्यांना सविस्तर सूचना दिल्या व डोळ्यांची काळजी कशी घ्यायची या बाबत माहिती दिली. या शिबीराचे यंदाचे पाचवे वर्ष असून आजवर या शिबीराच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी तीन हजारांवर शस्त्रक्रीया करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याचे लहाने यांनी नमूद केले. अनेक रुग्णांनीही या प्रसंगी लहाने व पवार यांची भेट घेत आभार व्यक्त केले. अनेक आजी आजोबांना या वेळी अश्रू आवरले नाहीत. लहाने डॉक्टरांकडून शस्त्रक्रीया झाल्याचा आनंद अनेकांनी या वेळी बोलून दाखविला. फोरमच्या सर्व सदस्यांनी व सुनेत्रावहिनींनी जी काळजी घेतली त्या बद्दलही रुग्णांनी समाधान व्यक्त केले. नियोजनाचे रुग्णांनी केले कौतुक या शिबीरासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने जे नियोजन केले गेले, चहापासून ते निवासापर्यंतची सर्व व्यवस्था उत्तम राखली गेली, त्याचेही अनेक रुग्णांनी या वेळी कौतुक केले. दोन तीन दिवसात आम्हाला आम्ही शस्त्रक्रीयेसाठी आलो आहोत याची जाणीवच झाली नाही, इतकी काळजी घेतली गेली असे त्यांनी सांगितले.या शिबीरामध्ये अनेकांच्या दुस-या शस्त्रक्रीय झाल्या आहेत , या पूर्वी फोरमच्याच शिबीरात आम्ही मोतीबिंदूची शस्त्रक्रीया केलेली आहे, त्या मुळे आता दुस-या डोळ्याच्या शस्त्रक्रीयेसाठीही आम्ही फोरमच्या शिबीराची वाट बघत होतो आणि आता या शिबीरात आमची शस्त्रक्रीया झाल्याची प्रतिक्रीया काही रुग्णांनी या वेळी बोलून दाखविली.