Events

Vidhayak Ganeshutsav


08/22/17


चला....पर्यावरण चळवळीत सहभागी होऊ या... दरवर्षी बारामती शहरातील नीरा डावा कालव्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे विघटन होत नसल्याने या मुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ही बाब विचारात घेऊन एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या श्री गणेश मूर्ती बनविण्याची चळवळ हाती घेण्यात आली आहे. बारामती शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या मदतीने आजपर्यंत एक हजाराहून अधिक शाडूच्या गणेशमूर्ती विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर हातांनी साकारल्या आहेत. त्यांची रंगसंगतीही मुलांनीच केलेली आहे. बुधवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी एकाच वेळेस दोन हजार शाडूच्या मूर्ती साकारण्याचे उद्दीष्ट एन्व्हॉर्यमेंटल फोरमने हाती घेतले आहे. बारामतीतील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये विद्यार्थी या मूर्त्या साकारणार आहेत. बारामतीत एकाच वेळेस दोन हजारांहून अधिक शाडूच्या गणेश मूर्ती एकाच ठिकाणी होण्याचा एक वेगळा विक्रम या निमित्ताने होणार आहे. आपणही पर्यावरणप्रेमी यात सहभागी होऊन आपली मूर्ती आपल्या हातांनी तयार करुन तिची प्राणप्रतिष्ठा करु शकता. आपल्या शहरातील पर्यावरण सुरक्षित असावे या साठी बारामतीकरांनाही या चळवळीत आपला सहभाग नोंदवावा अशी नम्र विनंती. चला तर मग श्री छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून श्री गणेशाच्या मूर्ती साकारण्याच्या कामात आपणही सहभागी होऊ यात....