Events

Water conservation


03/22/18


उन्हाच्या तीव्रतेसोबतच  वन्यक्षेत्रातील पाण्याचे स्त्रोतही संपू लागले आहेत. वन्यजीवांना पाऊस सुरु होईपर्यंत पिण्याचे पाणी कमी पडू नये या उद्देशानेच एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने 22 मार्च जागतिक जलदिन व वनदिनाचे औचित्य साधून गेल्या 5 ते 6 वर्षेंपासुन बारामती तालुक्यातील वनविभागातील पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्यात येते याचाच एक भाग म्हणुन दि 22 मार्च 2018 पासून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला होता. बारामती तालुक्यातील गाडीखेल (वेताळबाबा मंदिर) येथील वनपरिक्षेत्रातील पाण्याच्या टाकीत फोरमच्यावतीने वन्यजीव प्राण्यासांठी फोरमच्या प्रमुख सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहास्ते टँकरद्वारे पाणी सोडले गेले. या प्रसंगी फोरम सदस्य, वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.