Events

मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया


06/28/18


बारामती येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान बारामतीत मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी या बाबत माहिती दिली. सुप्रसिध्द नेत्रचिकित्सक पदमश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख या शिबीरात रुग्णांवर मोफत शस्त्रक्रीया करणार आहेत. शस्त्रक्रीये नंतरच्या तपासण्या व चष्मा देखील मोफत दिला जाणार आहे. रुग्णांच्या निवास, नाश्ता व भोजनाचीही सोय फोरमच्या वतीने केली जाणार आहे. फोरमच्या वतीने आजवर चार हजारांहून अधिक मोफत बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. बारामतीतील शिबीरासह मुंबईला बसद्वारे रुग्णांना नेऊन जे.जे. रुग्णालयातही रुग्णांवर मोफत शस्त्रक्रीया करण्याचे काम दरवर्षी फोरमतर्फे केले जाते. यंदाही माजी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शिबीर बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली ग्रामीण रुग्णालयात होणार आहे. यंदा 9 ऑगस्ट रोजी रुग्णांची तपासणी होईल, 10 व 11 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रीया होणार आहेत. या शिबीरासाठी ज्यांना नावनोंदणी करायची आहे त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात ही नोंदणी करावी. या बाबत अधिक माहितीसाठी सचिन पवार 9623636262 किंवा नीलेश जगताप 9637161600 यांच्याशी संपर्क साधावा.