Events

Mrudgandh 2019


09/22/19


बारामती शहर, ता. 22- येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मृद्गंध 2019 या स्पर्धेत यंदा भिगवण येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल बिल्टने सादर केलेल्या एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ या नाटिकेस प्रथम क्रमांक मिळाला. या स्पर्धेचे यंदाचे दहावे वर्ष होते. या स्पर्धेत चौदा शाळांनी सहभाग नोंदविला. संस्थेच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सुरु झाली आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान सीबीएसई शाळेच्या संगीतातून हृदयपरिवर्तन या नाटिकेस द्वितीय, तर विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर शाळेच्या चार भिंतीपलिकडचे खरे शिक्षण या नाटिकेस तृतीय क्रमांक प्राप्त झाला. कटफळ येथील झैनुबिया इंग्लिश मिडीयम स्कूलने सादर केलेल्या मूल्यशिक्षण, दहशतवादावरील उपाय या तसेच विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदीर शाळेने सादर केलेल्या याच विषयावरील नाटिकेस उत्तेजनार्थ पारितोषक प्रदान केले गेले. विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीरची मुक्ता पाठक व विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल बिल्टचा साई गिरी या दोघांना उत्कृष्ठ अभिनयासाठी तर इंदापूर इंग्लिश मिडीयम स्कूलला उत्कृष्ठ नेपथ्याचे, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल बिल्ट शाळेस उत्कृष्ठ लेखन व संवादासाठी तर म.ए.सो. चे ग.भि. देशपांडे विद्यालय व न्या बाल विकास मंदीर पिंपळीच्या शाळेस उत्कृष्ठ दिग्दर्शनाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. श्रीमती शुभदा मोघे व डॉ. मंजिरी नेऊरगावकर यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले. डॉ. संजीव कोल्हटकर, विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त अँड. नीलीमा गुजर, संस्थेचे रजिस्ट्रार श्रीश कंभोज, प्राचार्य डॉ. भरत शिंदे, महंमद शफिक संकेश्वरकर, माधवी गोडबोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. अॅड.नीलीमा गुजर यांनी स्पर्धेमागील पार्श्वभूमी विशद केली.