Events

Helping people in Corona


05/20/20


*कोणत्याही संकटात समाजासोबत उभे राहणे हेच आद्यकर्तव्य...* जगावर कोरोनाचे संकट आले आणि हे थैमान बघता बघता आपल्या घरापर्यंत पोहोचले.असा आजार की, ज्यावर अजूनही औषध उपलब्ध नाही पण म्हणून काय स्तब्ध राहायचे तर नाही आपण आपल्या परिने जे काही करू शकतो ते करायचे आजवर याच विचारांनी एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया गेली 10 वर्षे पर्यावरण आणि समाजासाठी काम करीत आहे. याही संकटात आदरणीय *सौ. सुनेत्रावहिनी पवार* यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तमान परिस्थितीचा विचार करता ज्यावेळी खऱ्या अर्थाने मास्कचा तुटवडा जाणवत होता त्यावेळी *फोरम व बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या* वतीने जे खऱ्या अर्थाने या कोरोनाविरुद्धच्या लढाईत रस्त्यावर उतरले अशा पोलिस अधिकारी, प्रशासन,सफाई कामगार, बँक कर्मचारी,जीवनावश्यक वस्तू विक्रेते इतकेच काय तर ज्याला गरज आहे त्या प्रत्येकाला मास्क पुरविण्यात आले. आता मास्कचा वापर वाढलेला दिसेलही परंतु ज्यावेळी मास्कच उपलब्ध होत नव्हते अशावेळी 10 ते 12 पेक्षा जास्त मास्क पंचक्रोशीत वाटले गेले तेही केवळ हे आपले आद्यकर्तव्य आहे याचं भावनेने...