Events

Mask Distribution


07/09/20


बारामती येथील पंचायत समिती व बारामती नगरपालिकेतील कर्मचा-यांसाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व फेरेरो इंडिया लिमिटेड कंपनीच्या वतीने मास्कचे वाटप केले गेले. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव व गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्याकडे हे मास्क सुपूर्द करण्यात आले. कोरोनाच्या काळात एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने मार्च महिन्यापासून आजतागायत बारामती नगरपालिकेच्या सफाई कर्मचारी, उद्यान विभागातील कर्मचा-यांना हजारो मास्कचे वाटप केलेले आहे. कोरोनाच्या काळात बारामती नगरपालिका तसेच पंचायत समितीच्या विविध विभागाच्या कर्मचा-यांनी केलेले काम मोठे आहे. या यंत्रणेला सहकार्य करण्याच्या उद्देशाने हे मास्कवाटप केल्याचे सुनेत्रा पवार यांनी या वेळी सांगितले. दरम्यान किरणराज यादव व राहुल काळभोर यांनी फेरेरो व फोरमच्या वतीने मास्क प्रदान केल्याबद्दल आभार व्यक्त केले.