Events

Prakalp meghdoot


03/23/16


आज दि.30 मार्च रोजी सकाळी 9.00 वाजता एन्व्हॅमेंन्टल फोरम ऑफ इंडियाच्या प्रकल्प मेघदूत आंतर्गत बारामती तालुक्यातील कोळोली या गावामध्ये ओढाखोलीकरण व रूंदीकरण कामाचा शुभारंभ आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते व मा.श्री.संतोष जाधव उपविभागिय अधिकारी, बारामती व मा. श्री.निलप्रसाद चव्हाण तहसिलदार ,बारामती. यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला . या प्रसंगी बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर ,सभापती श्री.करण खलाटे ,उपसभापती श्री.दत्तत्रय लोंढे कोळोली गावच्या सरपंच सौ.राजश्रीताई काटे ,माजी सदस्य , सर्व फोरम सदस्य व कोळोली गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.