Gallery

Save sparrow


It is high time that we work towards saving sparrowsOdha kholikaran


Press coverage of project meghdoot, karkhelOdha kholikaran


फोरम ने केलेल्या ओढा खोलीकरणयृ कामामुळे जळगाव सुपे येथीलOdha kholikaran


उंडवडी सुपे येथील ओढा काल रात्री झालेल्या पावसाने भरला आहे... ग्रामस्थांकडून वाहिनीसाहेबांचे आभार... बऱ्हाणपूर येथील ओढा पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला...Paryavaran mohotsav


Press highlights of Paryavaran mohotsavScience day 2017


बारामती- अवकाशसंशोधनामध्ये आज भारताने जी झेप घेतली आहे ती असामान्य आहे, अत्यंत कमी पैशात अतिशय उच्च दर्जाचे संशोधन करणा-या शास्त्रज्ञांमुळे हे शक्य झाल्याची माहिती विज्ञानविषयक पत्रकार मयुरेश प्रभुणे यांनी दिली. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून इस्त्रोची विक्रमी अवकाश झेप या विषयावर प्रभुणे यांच्या व्याख्यानाचे आज आयोजन करण्यात आले होते. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात आज जागतिक पातळीवर भारत सर्वोच्च स्थानावर आहे. आपल्या संशोधकांकडून एकाच वेळेस 104 उपग्रह अतिशय अचूकपणे अवकाशात एकाच वेळी प्रक्षेपित करण्याची किमया इस्त्रोने साध्य करुन दाखविली आहे. भारतीय अवकाश संशोधनाचा स्वातंत्र्यानंतर सुरु झालेला प्रवास प्रभुणे यांनी सविस्तरपणे उलगडून दाखविला. या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांचा परिचय करुन देत आपले अवकाश संशोधन किती प्रगत होत गेले, विशेष म्हणजे अमेरिका व रशियाच्या तुलनेत भारताचा खर्च किती अत्यल्प होता याचेही विवेचन त्यांनी या वेळेस केले. मंगळावर यान पाठविण्याच्या मोहिमेविषयीही त्यांनी या वेळी माहिती दिली. या मोहिमेच्या प्रारंभापासून ते 104 उपग्रहांच्या प्रक्षेपणापर्यंतचा प्रवास तसेच भविष्यातील इस्त्रोचे काही प्रकल्प या बाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतीय अवकाश संशोधन आजमितीस जागतिक स्तरावर सर्वोच्च आहे, आणि आपण देशांतर्गत सर्व सुटे भाग बनवून हे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करतो हेही आपले यश म्हणावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त अँड. नीलीमा गुजर यांनी मयुरेश प्रभुणे यांचे स्वागत केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले, संगीता काकडे यांनी आभार व्यक्त केले.