जागतिक हात धुवा दिन
१५ ऑक्टोबर जागतिक हात धुवा दिनानिमित्त फोरमच्या प्रमुख सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांचा मार्गदर्शनाखाली आज सकाळी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. या निमित्त बारामती शहरातील कविवर्य मोरोपंत शिक्षण संस्था मार्केट यार्ड आमराई बारामती येथील शाळेत जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.. यावेळी फोरम सदस्यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या प्रात्यक्षिकांसह त्याचं महत्व पटवून दिलं.. दैनंदिन जीवनात आपण स्वच्छता अंगीकारणं गरजेचं असून त्यातूनच आपण निरोगी जीवन जगू शकतो.. त्यामुळंच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करत त्यांना स्वच्छतेबद्दल माहिती देण्यात आली
Share via: