
रंगोत्सव स्पर्धेत 18 शाळातील 3500 विद्यार्थ्यांचा
रंगोत्सव स्पर्धेत 18 शाळातील 3500 विद्यार्थ्यांचा सहभाग…. आज दि. 20 ऑक्टोबर रोजी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित रंगोत्सव 2023 स्पर्धेत 18 शाळेतील जवळपास 3500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी रंगोत्सव या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येते. यंदा पाचवी ते सातवीसाठी घरातील स्वच्छता करणारे कुटुंब, माझा आवडता खेळ, आवडते निसर्ग ठिकाण, बैलपोळा हे विषय तर आठवी ते दहावीसाठी दुर्गोत्सव, स्वच्छता अभियान, वृक्षसंवर्धन, शेतात काम करणारा शेतकरी असे विषय देण्यात आले होते. सर्व शाळातील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभागी झाले होते. फोरमच्या सदस्यांनी प्रत्येक शाळात …
Share via: