वृक्षारोपण
मा. दादांच्या वाढदिवसानिमित्त एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया आणि बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून बारामती शहरातील सुर्यनगरी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासह आपली बारामती हरीत व्हावी या उद्देशानं वृक्षारोपणाची व्यापक चळवळ हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील विविध भागातील रिकाम्या जागांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे.. यावेळी बा.न.प.चे मुख्याधिकारी श्री.महेश रोकडे ,उद्यानविभागाचे पठाण साहेब आणि फोरम सदस्य उपस्थित होते..
Share via: