स्वच्छ ही सेवा

स्वच्छ ही सेवा

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवड्यांतर्गत आयोजित स्वच्छ ही सेवा या उपक्रमात मा. दादांसमवेत सहभाग घेत श्रमदान केलं. बारामती शहरातील कविमोरोपंत शाळा परिसर आमराई,क-हानदी पात्र, मेहता हाॅस्पिटल ते रेल्वे लाईन मेडिकल‌ काॅलेज रोड आदी भागात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.. त्यामध्ये एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सदस्यांनीही सहभाग घेतला.. मा. दादांनीही सर्व सदस्यांसमवेत श्रमदान करत स्वच्छतेबाबत सुचनाही केल्या. व्यक्तीगत आयुष्यात स्वच्छतेची आवड असेल तर आपला परिसरही स्वच्छ राहायला मदत होईल. त्या अनुषंगाने प्रत्येकानंच प्रयत्नशील राहायला हवं..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link