Golden memories 29/10/2017
अखिल भारतीय महिला मराठा महासंघाचा ‘तेजस्विनी पुरस्कार’ मुंबई येथे झालेल्या महासंघाच्या तिसऱ्या स्नेहसंमेलनात मला देण्यात आला. याचा मी नम्रपणे स्वीकार करते. हा पुरस्कार मी कोपर्डी तसंच इतर भागांमधील अत्याचारग्रस्त भगिनींच्या स्मृतीस अर्पण करते. आजही अनेक गोष्टींसाठी महिलांना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर संघर्ष करावा लागत आहे. या संघर्षाला एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम अखिल भारतीय महिला मराठा महासंघ करत आहे याचा मला आनंद आहे. याशिवाय मराठा राजवटीतील महिलांच्या योगदानावरही महिला मराठा महासंघ सध्या संशोधन करत आहे. यामुळे महिलांचा एक गौरवशाली इतिहास आपल्यापुढे येणार आहे. या संमेलनास कविताताई विचारे, विजयाताई भोगले पाटील, ऍड. प्रतिमाताई शेलार, तेजस्विनीताई जगताप, अलकाताई केरकर, अश्विनीताई राजे जाधवराव, प्रीतीताई पाटणकर, शोभाताई सावंत, वैशालीताई जोंधळे पाटील, दीपाताई घाग, सीमाताई राजे शिर्के, मंजुश्री अहिरराव, सन्माननीय मानकुँवरताई देशमुख, अनुजाताई पाटील, राजश्रीताई विश्वासराव, रोहिणीताई घोसाळकर, ज्योतीताई इंदप, सुवर्णाताई पवार, लताताई निकम या महिला भगिनी उपस्थित होत्या.
Share via: