एन्व्हॅमेन्टल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने जागतिक जलदिना निमित्त 22 मार्च 2016 पासुन दररोज बारामती परिसरातील वनक्षेत्रा मध्ये वन्यजीवांसाठी पाणी सोडण्याचा उपक्रम सुरू आहे. आज का-हाटी येथे फोरमच्या अध्यक्ष सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाणवठ्याची पहाणी केली . त्यांच्या उपस्थितीत या वनक्षेत्रात टँकरद्वारे पाणी सोडले गेले. या प्रसंगी पंचायत समितीचे सभापती करण खलाटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वन्यजीवांना टंचाईची तीव्रता भासू नये म्हणून दरवर्षी उन्हाळ्यात फोरमच्या वतीने हा उपक्रम राबविला जातो