जागतिक हात धुवा दिन, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून आज एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने बारामती नगरपरिषदेच्या शाळा क्र. ५ व ६ मध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना हात धुण्याचं महत्व पटवून देत प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभाग घेत नियमीत स्वच्छता राखण्याचा संकल्प केला.. विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या प्रसंगी अजित दादा पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील साहेब, शाळा क्रमांक ५ चे मुख्याध्यापक देविदास ढोले सर ,शाळा क्रमांक ६ चे मुख्यध्यापक यशवंत गावित सर , शिक्षक आणि फोरम सदस्य उपस्थित होते.