शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या शिबीराचे आयोजन केले गेले. मुक्ताई रक्तपेढीने या साठी सहकार्य केले आहे. आज झालेल्या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, माळेगावचे संचालक केशवराव जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व भारती मुथा फोरम सदस्यांसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.