भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यां 125 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने 14 -4-15 ते 16 हे वर्ष समता व सामाजिक न्याय म्हणुन साजरे करण्यात येत आहे.त्या निमित्त समाज कल्याण आयुक्तालय, पुणे आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्याने व्यक्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तालुका निहाय करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणुन सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना जनमानसात प्रसिध्द होण्याकरता बार्टी च्या वतीने चित्ररथ आज बारामती मध्ये दाखल झाला याचे स्वगत सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले . या प्रसंगी या चित्ररथ चे स्वागत करून त्यानां या उपक्रमा बाबद शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बार्टी चे तालुका समन्वयक श्रीमती आशा काळे, गृहपाल सौ.विजयश्री बाबर , श्री.अमोल भालके तुळजाराम चतुरंचद महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. चंद्रशेखर मुरूमकर सर उपस्थित होते.