एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिच्या वतीने आयोजित मृद्गंध 2015 विविध गुणदर्शन स्पर्धेत महाविद्यालयीन स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालय व शालेय स्तरावरील स्पर्धेत विदया प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूलने (एस.एस.सी. विभाग) बारामती , प्रथम क्रमांकाच्या चषकावर आपले नाव कोरले. अत्यंत उत्साह व संपूर्ण ताकदीनिशी आपली कलाकृती सादर करीत बारामतीतील शाळा व महाविद्यालयांनी यंदाची मृद्गंध 2015 ही स्पर्धा गाजविली. मृद्गंध 2015 स्पर्धेमध्ये यंदा 15 ऑगस्ट रोजी 13 महाविद्यालयांनी तर 16 ऑगस्ट रोजी 15 शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. एकूण 450हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. यंदा शालेय स्तरावर द्वितीय क्रमांक विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल (सीबीएसई) स्कूल तर तृतीय क्रमांक विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलने प्राप्त केला. तर धों. आ. सातव विद्यालय बारामती आणि विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदीर पिंपळी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. उत्क़ृष्ट नेपथ्यासाठी विद्या प्रतिष्ठानची मराठी माध्यमिक शाळा, उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी बारामती नगरपरिषद शिक्षण मंडळ शाळेच्या सौ. कांबळे व सौ. पाठक यांना तर उत्कृष्ट लेखन व अभिनयासाठीची दोन्ही पारितोषिके विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूलला (एस.एस.सी. विभाग) प्रदान केली गेली. तन्वी संतोष कांबळे हिला कीर्तनकाराच्या भूमिकेबद्दल तर संदीप वाबळे यांना लेखनाबद्दल पारितोषिक दिले गेले. महाविद्यालयीन स्तरावर द्वितीय क्रमांक विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभाग तर तृतीय क्रमांक शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी यांना प्रदान केले. विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वरिष्ठ विभाग आणि व्ही.आय.आय.टी एमबीए विभाग यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान केले गेले. नेपथ्याबद्दल विद्या प्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेजचे स्वप्निल बोरुडे यांना, लेखन व दिग्दर्शनाबद्दल विद्या प्रतिष्ठान अध्यापक विद्यालयाचे युवराज भोसले यांना पारितोषिक दिले गेले. तर विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा स्वप्निल कुचेकर व शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाची स्वाती कडू यांना अभिनयाची पारितोषिके दिली गेली. शालेय स्तरासाठी डॉ. रंजना नेमाडे व डॉ. दीपाली जाधव यांनी तर महाविद्यालयीन स्तरासाठी मकरंद गोडबोले व सुशांत काकडे यांनी परिक्षण केले. महाविद्यालयीन स्तराची पारितोषिकि जय मल्हार मालिकेतील बानूची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर हिच्या हस्ते तर शालेय स्तरावरील पारितोषिके अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या हस्ते प्रदान केली गेली. संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी या प्रसंगी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.