बारामती, ता. 27- 24 व्या नॅशनल चिल्ड्रेन सायन्स काँंग्रेसचे बारामतीत उदघाटन संपन्न. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (व्हीआयआयटी) आणि नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन व भारत सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व एन्व्हॉर्यमेन्टल फोरम ऑफ इंडिया,बारामती यांच्या वतीने आयोजित 24 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक कॉंग्रेसचे उद्घाटन केंद्रिय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब अध्यक्षस्थानी होते. तसेच खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा वहिनी पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री. मिलिंद कुलकर्णी, राष्ट्रीय प्रकल्प समन्वयक श्री.सुजित बॅनर्जी, नॅशनल अँकडेमिक समितीचे अध्यक्ष श्री. टी. पी. रघुनाथ, नगराध्यक्ष श्री. योगेश जगताप, नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव श्री. द.रा. उंडे उपस्थित होते. विद्यार्थ्यां मधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन नवनवे प्रयोग त्यांनी सादर करून देशाच्या प्रगतीत हातभार लावावा अशी यामागील संकल्पना आहे.