जागतिक महिला दिनानिमित्त सुषमा सातपुते दिग्दर्शित व सुषमा सातपुते आणि संदिप बालवडकर निर्मित *मासिका जागर* या लघुपटाचे आनावरण आज दि. 8 मार्च 2017 जागतिक महिला दिनानिमित्त ग. दि. मा. सभागृहा मध्ये संपन्न झाला. एकीकडे स्त्री स्वातंत्र्याविषयी चर्चा करतो खर,आपल आरोग्य व्यवस्थित असण, आपल्या व कुटुंबाच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्वाच असते. म्हणूनच आज महिला दिनाचे औचित्य साधुन बारामती तालुक्यासह राज्यभरातील तळागाळातील महिला व मुलींना वयात येणा-या मुलींसाठी उपयुक्त *मासिका जागर* हा लघुपट दाखविण्याचे अभियान एन्व्हॉर्येमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने सुरु करण्यात आल्याची घोषणा फोरमच्या प्रमुख सौ. सुनेत्रा पवार यांनी केली. आज महिला कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असल्या तरी आपण सर्वात अगोदर आपल्या शरीराची व तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित तपासण्या, परिपूर्ण आहार व पुरेसा व्यायाम या तीन गोष्टीं आपण जपल्या तर आपण निश्चित सुदृढ राहू. असे अवाहन सौ. सुनेत्रा पवार यांनी उपस्थित महिलांना केले. या प्रसंगी या लघुपटामध्ये काम केलेल्या कलाकारांसह निर्माते व दिग्दर्शकांचा सत्कार ही करण्यात आला या कार्यक्रमास बारामतीच्या नगराध्यक्षा सौ. पोर्णिमा तावरे,टेक्सटाईल पार्कचे सी.ई.ओ. श्री. संकेश्वरकर साहेब,विद्या प्रतिष्ठाणच्या विश्वस्त अँड. निलिमा गुजर, सुषमा सातपुते, डॉ.हेमलता जळगावकर,संदिप बालवडकर, डॉ. दिपाली जाधव, वर्ल्ड रेकॉर्डस ऑफ इंडिया महाराष्ट्राचे प्रमुख श्री. दिनेश पैठणकर, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे मानकरी श्री.संतोष राऊत, श्री. प्रकाश वाकुडे , फोरम सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.