बारामती- एन्व्हॉर्यमेंन्टल फोरम ऑफ इंडियाच्या ७ व्या वर्धपन दिना निमित्त दि. १३ मार्च २०१७ रोजी चिराग गार्डन बारामती येथे स्नेह मेळावा व वसुंधरा पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण रक्षण व विधायक उपक्रम राबविण्याच्या नुसत्या गप्पा मारत बसण्यापेक्षा आपण यात खारीचा वाटा उचलावा या संकल्पने मधुन २०१० मध्ये एन्व्हॉर्यमेंन्टल फोरम ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. पर्यावरणा सोबतच आरोग्य शिक्षण,विज्ञान, कला, सांस्कृतिक अशा अनेक विषयात फोरमचे गेल्या ७ वर्षेंमध्ये सातत्यपुर्ण काम सुरू आहे. ७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत फोरमच्या प्रमुख सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहास्ते ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक व सर्पमित्र श्री.नीलिमकुमार खैरे यांना वसुंधरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. निलिमकुमार खैरे यांचे कार्य प्रचंड मोठे आहे, सापांविषयी जागृती करण्यासाठी या माणसाने आपले आयुष्य वेचले आहे. या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव द.रा. उंडे, खजिनदार रमणिक मोता, विश्वस्त अँड. नीलीमा गुजर, श्रीकांत सिकची, टेक्सटाईल पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी महंमद शफीक संकेश्वरकर ,बारामती पंचक्रशितील विविध सामाजिक - राजकीय संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, शासकिय-निमशासकीय अधिकारी, व सातत्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फोरमला मदत करणारे नागरीकव फोरम सदस्य मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते.