२१ जुन - आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून आज विद्या प्रतिष्ठान व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने योगशिबीराचे आयोजन करण्यात आले. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या शिबीराचे उदघाटन झाले. गेल्या एक वर्षापासून योगासन वर्ग विद्या प्रतिष्ठान व फोरमच्या वतीने चालविला जात आहे, त्याचा वर्धापनदिनही आज साजरा करण्यात आला. या प्रसंगी योगशिक्षक नातू निटवे, योगशिक्षीका कमल ननवरे व कल्पना शेलार यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना योगासनांची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. सुमारे दीड तास सर्वांनी योगासने केल्यानंतर आता नियमीत योगासने करणार असल्याचे अनेकांनी या प्रसंगी सांगितले. योगासनांमुळे अनेक व्याधी दूर होतात व शरीर सुदृढ बनते असे योगशिक्षकांनी या वेळी नमूद केले. विद्या प्रतिष्ठानमध्ये सुरु असलेल्या योगवर्गात अधिक जणांनी सहभागी होणार असल्याचे सांगितले.