• Home
  • About
    About EFOI Team EFOI
  • Events
  • Special Events
  • Gallery(current)
  • Videos
  • Contact

*आम्ही भागीदार विधायक उपक्रमाचे*

Share this

*आज मुलांच्या चेहऱ्यावरील गणेशमूर्ती बनविण्याचा आनंद ,डोळ्यातील चमक आणि तन्मयता पाहताना असे वाटले की आपण एक N G O म्हणून पर्यावरणपूरक चळवळ उभी करत आहोतच पण कळत नकळत त्यासोबत इतर अनेक घटकांना एकत्र गुंफण्याचा सुंदर प्रयत्न आपल्या हातून घडतो आहे सर्व निरागस मुले-मुली आपल्यातील सर्जनशीलतेला वाव देताना दिसली यातून आपण उद्याची पिढी सकारात्मक आणि क्रिएटिव्ह बनवित असल्याची जाणीव झाली .पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा कसा करावा हा संदेश देण्यात आपण आता बऱ्याच अंशी यशस्वी झालो आहोत ,ही जाणीव जागृती करण्याचा सर्वात महत्वाचा घटक(छोटी मुले) आपण टार्गेट केला आहे यातच आपले यश आहे आणि या जागृतीबरोबरच आपल्या कार्यशाळेत तयार झालेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार, याचा अर्थ आपण यातून आर्थिक बचतीचाही संदेश देणार आहोत त्यामुळे हळूहळू संपूर्ण समाज आपल्या या चळवळीचा भाग होणार यात शंकाच नाही. यावर्षी आपण 2200 मूर्ती बनविल्या मला खात्री आहे आपण इतक्याच प्रामाणिकपणे हा यज्ञ सुरू ठेवला तर पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणारे बारामती हे पहिले शहर ठरेल .अर्थात हे सर्व शक्य झाले आदरणीय वहिनींच्या चिकाटीमुळे* *सलाम वहिनी आणि टीम वहिनी* 🙏🙏🙏🙏🙏

  • evf
  • evf
  • evf
  • evf
  • evf
  • evf
  • evf

2023 | Feelsofts