एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मृद्गंध 2017 स्पर्धेत महाविद्यालयीन स्तरावर शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसीने सादर केलेल्या पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ...या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावित मृद्गंध चषकावर आपले नाव कोरले. विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्सिट्टयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या संघाने सादर केलेल्या हत्या कोणाची..व्यक्तीची की विचारांची या नाटिकेस द्वितीय तर शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला. येथील गदिमा सभागृहात रविवारी (ता. 27) या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेला महाविद्यालयीन युवक युवतींनी उदंड प्रतिसाद दिला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- उत्तेजनार्थ पारितोषिक- विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, उत्कृष्ट अभिनय – पल्लवी भास्करे व कौस्तुभ भालेदारे यांना विभागून, उत्कृष्ठ लेखन व संवाद- मयुरी पाटील व प्रतिक्षा काळभोर यांना, उत्कृष्ठ दिग्दर्शन- पल्लवी भास्करे, विनायक जोगळेकर व कल्पना जवळीकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. फोरमच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी प्रास्ताविकात या स्पर्धेविषयी पार्श्वभूमी विशद केली. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने व सामाजिक संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, चित्ततोष खांडेकर, विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त अँड. नीलीमा गुजर, संस्थेचे रजिस्ट्रार कर्नल (निवृत्त) श्रीश कंभोज या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. इतर सर्व सामाजिक उपक्रमांसोबतच फोरमच्या वतीने या पुढील काळात अवयवदानाच्या प्रचार व प्रसाराचे काम होणार असल्याची घोषणा फोरमच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा पवार यांनी या वेळी केली. फोरमच्या वतीने अवयवदानाचे महत्व समाजाला समजून सांगण्यासोबतच त्यांचे अवयवदानाचे फॉर्म भरुन घेण्याचे काम येणा-या काळात करण्यात येणार आहे.