दि. 17 ते 20 ऑगस्ट 2017 रोजी - महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पुणे जिल्हा परिषद, पुणे जिल्हा अंधत्व निवारण सोसायटी व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीरात शुक्रवार व शनिवार मिळून दोन दिवसात 428 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रीया करण्यात आल्या. डॉ तात्याराव लहाने व डॉ रागिणी पारेख यांनी या शस्त्र क्रिया यशस्वी पार पाडल्या. या शिबीरात तपासणी केलेल्या उर्वरीत रुग्णांवर शस्त्रक्रिया मुंबई येथे करण्यात येणार होत्या त्यापैकी पहिल्या दोन बस 100 रुग्णांसह शस्त्रक्रियेसाठी आज दि. 20 सप्टेंबर रोजी पहाटे 5.00 वाजता बारामतीहुन जे. जे. हॉस्पीटल मुंबई येथे रवाना झल्या