दि. 7 जानेवारी 2018 रोजी बारामती शहरातील नागरिकांना आरोग्याचा सल्ला देण्याच्या उद्देशाने बारामती नगरपालिका, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया आणि बारामती हॉस्पिटल यांच्या विद्यमाने आज पहिले मोफत सर्वरोगनिदान शिबीर पार पडले. या पुढील काळात बारामती शहरातील विविध प्रभागात अशी शिबीरे फोरमच्या वतीने आयोजित केली जाणार आहेत. फोरमच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या संकल्पनेतून ही शिबीरे बारामतीत होणार आहेत. आज आमराई विभागातील माता रमाई भवन येथे आयोजित शिबीराचे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व बारामती हॉस्पिटलचे डॉ. दिलीप लोंढे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उदघाटन झाले. या शिबीरात आमराई प्रभागातील रुग्णांची कान, नाक, घसा, हाडे, त्वचा तसेच इतरही रोगांची तपासणी करुन त्यांना आवश्यक औषधे दिली गेली. या बाबत ज्या रुग्णांना अधिक तपासण्या किंवा सल्ल्याची गरज आहे ती त्यांना देण्यात येणार आहे. आज झालेल्या शिबीरामध्ये डॉ. दिलीप लोंढे, डॉ. संजय पुरंदरे, डॉ. प्राजक्ता पुरंदरे, डॉ. प्रितम ललगुणकर, डॉ. गोकुळ काळे, डॉ. दिनेश ओसवाल, डॉ. महेंद्र नाझिरकर, डॉ. महादेव स्वामी, डॉ. जे.जे.शहा, डॉ. भास्कर जेधे, डॉ. सौरभ मुथा, डॉ. सुयश शहा, डॉ. सौरभ निंबाळकर, डॉ. चंद्रशेखर धुमाळ, डॉ. योगेश सिसोदीया, डॉ. दर्शना जेधे, डॉ. अमर पवार, डॉ. सुनिल पवार, डॉ. नीती महाडीक आदींनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या प्रसंगी गटनेते सचिन सातव यांच्यासह नगरसेवक मयूरी शिंदे, बिरजू मांढरे, अनिता जगताप, नीता चव्हाण, नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, सूरज सातव, अमर धुमाळ, सुधीर पानसरे, अतुल बालगुडे, नीलीमा मलगुंडे, सीमा चिंचकर, सविता जाधव, सुहासिनी सातव, कमल कोकरे, सत्यव्रत काळे, बाळासाहेब जाधव महिला अध्यक्षा वनिता बनकर, याच बरोबर अमराई परिसरातील युवक व फोरम सदस्य मोठ्य संख्येनी उपस्थित होते.