• Home
  • About
    About EFOI Team EFOI
  • Events
  • Special Events
  • Gallery(current)
  • Videos
  • Contact

सर्वरोग निदान शिबीर

Share this

बारामती - शहरातील नागरिकांना आरोग्याचा सल्ला देण्याच्या उद्देशाने बारामती नगरपालिका, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती हॉस्पिटल व मेडिकल सेल्स रिप्रेझेंटेटीव असोशिएशन यांच्या विद्यमाने आज दुसरे मोफत सर्वरोगनिदान शिबीर पार पडले. या पुढील काळात बारामती शहरातील विविध प्रभागात अशी शिबीरे फोरमच्या वतीने आयोजित केली जाणार आहेत. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून ही शिबीरे बारामतीत होत आहेत. आज दि. 4 फेब्रुवारी 2018 रोजी कसबा विभागातील खंडोबानगर, मोरगांवरोड, जामदाररोड, माळेगावरोड, फलटणरोड येथील नागरीकांसाठी धो.आ सातव (कारभारी) माध्यमिक विद्यालय ,कसबा येथे आयोजित शिबीराचे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व बारामती हॉस्पिटलचे डॉ. दिलीप लोंढे ,डॉ. गोकुळ काळे, डॉ. जे.जेे.शहा ,यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उदघाटन झाले. या शिबीरात कसबा विभागातील रुग्णांची कान, नाक, घसा, हाडे, त्वचा,मधुमेह, तसेच इतरही रोगांची तपासणी करुन त्यांना आवश्यक औषधे दिली गेली. या बाबत ज्या रुग्णांना अधिक तपासण्या किंवा सल्ल्याची गरज आहे ती त्यांना देण्यात येणार आहे. आज झालेल्या शिबीरामध्ये डॉ. दिलीप लोंढे, डॉ. संजय पुरंदरे, डॉ. प्रितम ललगुणकर, डॉ. गोकुळ काळे, डॉ. दिनेश ओसवाल, , डॉ. जे.जे.शहा, डॉ. सौरभ मुथा,डॉ.भास्कर जेधे, डॉ. सौरभ निंबाळकर, डॉ. चंद्रशेखर धुमाळ, डॉ. योगेश सिसोदीया,डॉ.दिपक महाडिक, डॉ. जितेंन्द्र आटोळे, डॉ. अमर पवार, डॉ. सुनिल पवार, डॉ.गणेश बोके,डॉ.अमित कोकरे,डॉ.प्रिती उनवणे, डॉ.भोसले, NUHM चे डॉ.हेमंत नाझिरकर, डॉ. योगेश सिसोदिया, डॉ. मृणाली जळक, आदींनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या शिबीरासाठी NUHM व बारामती मेडिकल सेल्स रिप्रेझेंटेटीव असोशिएशन चे अध्यक्ष काका साहेब आटोळे, संदिप नलवडे, रूषिकेश गाडेकर, अर्जुन गडदरे, रोहित कुंभार यांनी औषधे उपलब्ध करुन दिली. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव गटनेते सचिन सातव यांच्यासह नगरसेवक सुहासिनीताई सातव, संतोष जगताप, मिनाताई चिंचकर,सुरज सातव, अनिताताई जगताप, नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, नीलीमा मलगुंडे, कमलताई कोकरे बाळासाहेब सातव, मयुर लालबिगे, अल्ताफ सय्यद,सिध्दनाथ भोकरे, बबलु जगताप,विजय खरात, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा वनिता बनकर आदी उपस्थित होते.

  • evf
  • evf
  • evf
  • evf

2023 | Feelsofts