*विलक्षण अनुभूती निसर्गाची* निमित्त होते बारामती तालुक्यातील मुढाळेगावा जवळच असणाऱ्या म्हांगरेवाडी येथे जाण्याचे, येथे असणाऱ्या बर्गेवस्ती तलावातील निसर्गसौंदर्य पाहण्याचे.एरवी पूर्व युरोप, रशिया,फिनलँड येथे आढळणारा *भोरड्या* हा पक्षी भारतातील अनेक राज्यांमध्ये जुलैपासून येण्यास सुरुवात होते.परंतु गेल्या 4 दिवसांपासून हा भोरड्या चक्क आपल्या बारामती परिसरात वास्तव्यास आला आहे.अनेक पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता भोरड्यामध्ये आहे. त्यांचे समूहनृत्य पाहून निसर्गाची आणि निसर्गातील सौंदर्याची अनुभूती नक्कीच येते. या समूहनृत्यामध्ये एकमेकांप्रति असणारा विश्वास, शिस्त आणि एकत्र येऊन इतरांना भरभरून देता येणारा सुखद अनुभव हे सारेच आम्हाला दैनंदिन दिनक्रमापासून खूपच दूर घेऊन गेले.तो एक तास आपल्याला कितीतरी दिवसांची ऊर्जा आणि शिकवण देऊ शकतो याची जाणीव झाली. आणखी काही दिवस हे पक्षी याच भागात राहणार असून जास्तीत जास्त लोकांनी ही अनुभूती घ्यावी असे मनोमन वाटले.आपल्या तालुक्यातील एक गाव सर्वत्र पोहचविण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला लाभली आहे. निसर्गाप्रति प्रचंड आस्था असणाऱ्या *सौ.सुनेत्रावहिनी पवार* या स्वतः भोरड्या पक्षी पाहण्यासाठी उपस्थित होत्या.वहिनींसोबत निसर्गाचा अदभूत चमत्कार पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी फोरमच्या सदस्यांसह म्हांगरेवाडीतील ग्रामस्थ ,पंचक्रोशीतील इतर नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी या नव्या संधीचे सोने एक गावकरी म्हणून कसे करता येईल याविषयी आदरणीय वहिनींसोबत गावकऱ्यांनी चर्चा केली.डॉ.महेश गायकवाड यांनी भोरड्या पक्षाविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी सौ. सुनेत्रा वहिनींनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.