8 मार्च जागतिक महिलादिना निमत्त बारामती हॉस्पीटल व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित मोफत गर्भाशय व स्तन कॉन्सर निदान व निवारण शिबीराचे उद्घाटन एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहास्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती मिनाताई शहा, नगराध्यक्षा सौ. पोर्णिमा तावरे, उपाध्यक्ष श्री. बिरजू मांढरे, बारामती हॉस्पीटलचे अध्यक्ष श्री दिलिप लोंढे, डॉ. प्राजक्तता पुरंदरे, डॉ. मृणालिनी जळक, डॉ. मुग्धा भगत ,आजी-माजी पदाधिकारी व महिला मोठ्यासंख्येनी उपस्थित होते.