एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया तसेच विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रतिबिंब अंतर्गत आवाजाच्या दुनियेतील करिअरच्या संधी या विषयावर मेघना एरंडे यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने आवाजाच्या क्षेत्रात मेहनत केल्यास कशा पध्दतीने पुढे जाता येते, कोणत्या क्षेत्रात तुम्ही तुमचा ठसा उमटवू शकता या बाबत मेघना एरंडे यांनी सविस्तर माहिती दिली. मुलांशी संवाद साधत मुलांना सहभागी करुन घेत मेघना एरंडे यांनी मुलांना या प्रसंगी बोलते केले. मुलांनीही प्रसंगी शंका निरसन करुन घेतले. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, उपसभापती शारदा खराडे, विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त अँड. नीलीमा गुजर, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्यासह प्राचार्य, मुख्याध्यापक या प्रसंगी उपस्थित होते.