बारामती - सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे अंतर्गत पाणी फाऊंडेशन द्वारे सुरु असलेल्या स्पर्धेसाठी आज तालुक्यातील कटफळ येथे ग्रामस्थांनी श्रमदान केले. सलग समतल चर खोदाईचे काम माथा ते पायथा करण्याचे काम येथे सुरु झाले आहे. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा पवार यांनीही आज कटफळ येथे सकाळी श्रमदानात सक्रीय सहभाग दिला. गेले दोन तीन दिवस सुनेत्रा पवार या श्रमदानात सहभागी झाले होत. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचे स्वयंसेवकही ग्रामस्थांसमवेत आज या श्रमदानात सहभागी झाले होते.