आदरणीय सौ.सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शना खाली एन्व्हॅमेंन्टल फोरम ऑफ इंडिया, बारामती, यांच्या वतीने बारामती पंचक्रोशीतील तसेच आसपासच्या सर्वच तालुक्यात गोरगरीब गरजु जनतेसाठी गेली पाच वर्षां पासुन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जाते याचाच एक भाग म्हणुन आदरणीय पवार साहेबांच्या "अमृत मोहत्सवी वर्षा " निमित्त दि.23 डिसेंबर 2015 रोजी 120 पेशंन्ट तपासणी करून आज पहाटे 4.00 वाजता बारामती येथुन मुंबई येथील जे.जे.रूग्णालय येथे आज पाठविण्यात आले. " पद्मश्री.डाॅ.तात्याराव लहाने " व " डाॅ.रागिणी पारेख " यांच्या हस्ते सर्व रूग्णांची 23 -12-2015 ते 25-12-2015 दरम्यान मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असुन सर्व रूग्णांना पुन्हा बारामती येथे सुखरूप पोच करण्यात येणार आहे. सदर शिबिरा मध्ये सहभागी रूग्णांना सोडण्यास आलेल्या नातेवाईकांनी सौ.सुनेत्रावहिनी पवार यांच्या फोरमच्या वतीने केलेल्या कुशल नियोजन तसेच रूग्णांन साठी खाण्या पिण्याची आणि राहण्याची केलेली सोय व रूग्णांना बारामती ते मुंबई ते पुन्हा बारामती या प्रवासासाठी रूग्णाना येण्या जाण्या साठी आरामदायी बस यांची व्यवस्था पाहुन समाधान व्यक्त केले.