• Home
  • About
    About EFOI Team EFOI
  • Events
  • Special Events
  • Gallery(current)
  • Videos
  • Contact

श्रमदान

Share this

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र कण्हेरी येथे आज श्रमदान मोहिम राबविण्यात आली. पाणी फाऊंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेत कण्हेरी गाव सहभागी झाले आहे. आज सकाळी सात ते दहा तीन तास फोरमच्या सदस्यांसह सह्याद्री अँकेडमी, कदम क्लासेस, सत्यमेव अँकेडमी, राज अँकेडमी, राष्ट्रवादी करिअर अँकेडमी यांच्या सदस्यांनीही मोलाचा सहभाग नोंदविला. कण्हेरी सबस्टेशनच्या मागील बाजूस सलग समतल चराचे काम आज करण्यात आले. आज जवळपास 175 घनमीटरचे काम झाले असून त्यात 1 लाख 75 हजार लिटर पाणी साठणार आहे. याचा फायदा या परिसरातील ग्रामस्थांना होणार आहे. गटविकास अधिकारी प्रमोद काळे, पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक मयूर साळुंके, तांत्रिक प्रशिक्षक श्रीकांत शेलार, कण्हेरीच्या सरपंच आरती शेलार, उपसरपंच कमल शेलार, काटेवाडीचे सरपंच विद्याधर काटे, कण्हेरीच्या ग्रामसेविका पूनम गायकवाड, तलाठी तेजस्वी मोरे यांच्यासह कण्हेरी व काटेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच 5 जुन जागतिक पर्यवरणदिना निमित्त 3 ते 5 जुन पर्यवरण महोत्सवा संपन्न हेणार आहे.दि. 3 जुन रोजी मातीतल्या खेळांची जत्रा, 4 जुन रोजी वृक्षारोपण व 5 जुन रोजी सकाळी सायकल रॉलीचे आयोजन एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे,यामध्ये सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आव्हान फोरमच्या वतीने करण्यात आले आहे.

  • evf
  • evf
  • evf
  • evf

2023 | Feelsofts