• Home
  • About
    About EFOI Team EFOI
  • Events
  • Special Events
  • Gallery(current)
  • Videos
  • Contact

बारामतीत पर्यावरण सप्ताह

Share this

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष बारामती- एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 3 जून ते ५ जून यादरम्यान पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात आला आहे. पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन तसेच पर्यावरण जनजागृती करण्यासाठी शहरात पर्यावरण जनजागृतीसाठी फेरी व विविध उपक्रम राबविण्यात आले. वृक्षारोपण करणे, मातीतील खेळाची जत्रा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून पर्यावरणासंबंधीत जनजागृती करण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मातीतील खेळाची जत्रेत विटीदांडू, गोट्या, लगोरी, टायर पळविणे, भोवरा,सूर-पाट्या, सूर पारंब्या, गजगे,रस्सीखेच अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात होते.एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाने बारामती कन्हेरी रस्त्याला गतवर्षी पर्यावरण दिनानिमित्त ३०० झाडे लावण्यात आली, त्यापैकी २२९ वृक्ष जागविण्यात यश आले यंदा हि कन्हेरी रस्त्याला दुतर्फा ४०० झाडांचे रोपणन करण्यात आले आहे सदर झाडे जगविण्याची जबबदारी घेेतली असल्याचे फोरमने सांगितले. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नागरिकांनी जीवनशैली बदलताना आठवडय़ातून एकदा सायकल चालवावी, गेल्या काही वर्षापासून आरोग्यासाठी का होईना सायकल चालवणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. आरोग्याच्या जाणिवेतून चालवल्या जाणाऱ्या सायकलीने त्याचा पसारा मोठय़ा प्रमाणात वाढवला आहे याच मुख्य उद्देशाने सायकल रॅली काढण्यात आली होती. या सायकल रॅलीत एन्व्हॉर्यमेंटल फोरम चे सदस्य, बारामती सायकल क्लब, महिला सायकल ग्रुप, विद्यार्थी, भारत फोर्सचे कर्मचारी,विद्या प्रतिष्ठाण संस्थेतील कर्मचारी , शिक्षक , विद्यार्थी या रॅलीत सहभाग झाले होते. यावेळी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे,तहसीलदार हनुमंतरव पाटील ,नगरसेवक ,नगरसेविका, पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वय वर्षे ६ अदवैता सचिन घोळवे या चिमुकलीने बारामती ते नक्षत्रगार्डन हे सात कि.मी अतंर पुर्ण केले. जागतिक पर्यावरण दिन वेगवेगळ्या पद्धती साजरा करता येऊ शकेल. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता पर्यावरणाविषयक जनजागृती करणे गरजेचे आहे. – सुनेत्रा पवार अध्यक्षा एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया.

  • evf
  • evf
  • evf
  • evf

2023 | Feelsofts