होय, आम्ही आमच्या हातांनी तयार केलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार! बारामतीतील विद्यार्थ्यांचा संकल्प एन्व्हाॅर्यमेन्टल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा २४ ऑगस्टपासून सुरू आहे. बारामती आणि परिसरातील अनेक शाळा यात सहभागी असून विद्यार्थी मोठ्या उत्साहात गणेशमूर्ती घडवत आहेत. या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवतांना विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाविषयी जागृती तर होतच आहे शिवाय यानिमित्ताने त्यांच्यातील सृजनशीलताही समोर येत आहे. गणेश स्थापनेचा दिवस जसा जवळ येतोय तसा या चिमुकल्यांचा उत्साह वाढत आहे. स्वतःच्या हातांनी घडवलेल्या मातीच्या गणेशमूर्ती घरात स्थापन करणार असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. अगदी कुशल कारागिरप्रमाणे त्याचे हात मातीच्या गोळ्यावर चालत आहेत. मूर्तीतले बारकावे जपत त्यांना रंगरंगोटी करण्यात येत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव आम्ही कृतीतून साजरा करुन दाखविणार आहोत हा संकल्प सर्वच मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत आहे. एकीकडे नवनिर्मितीचा आनंद आणि दुसरीकडे पर्यावरण जपण्यात आपलाही खारीचा वाटा आहे याचा मनस्वी होणारा आनंद. बारामतीच्या गणेशोत्सवाची वाटचाल खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरकतेकडे सुरु आहे... फोरमच्या या उपक्रमात खालील शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. १) म. ए. सो. चे. कै. गजानराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती. २) विद्या प्रतिष्ठानचे विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर, बारामती. ३) अनेकांन्त इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती. ४) रयत शिक्षण संस्थेचे आर. एन. अग्रवाल टेक्निकल हायस्कूल, बारामती. ५) जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बारामती. ६) रयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शाहू हायस्कूल, बारामती. ७) विद्या प्रतिष्ठानचे मराठी माध्यमिक हायस्कूल, विद्यानगरी, बारामती. ८) विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्यानगरी, बारामती. ९) विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्यानगरी, बारामती. १०) धो. आ. सातव (कारभारी) हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कसबा, बारामती. ११) विद्या प्रतिष्ठानचे न्यू बाल विकास मंदिर,इंग्लिश मिडीयम स्कूल, पिंपळी. १२) श्रीमती गंगूबाई कृष्णाजी काटे देशमुख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काटेवाडी. १३) झैनबिया इंग्लिश मिडीयम स्कूल, कटफळ. १४) विद्या प्रतिष्ठानचे डाॅ. सायरस पूनावाला इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती. १५) छत्रपती शिक्षण संस्थेचे काटेवाडी हायस्कूल, काटेवाडी.