जागतिक महिला दिनानिमित्त वसुंधरा वाहिनी महिला मंच बारामती आयोजित सबला रॅली चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी वसुंधरा महिला मंचाच्या सदस्यांनी वसुंधरा वाहिनी कम्युनिटी सेंटर ते बारामती शहर आशी संपुर्ण शहरामध्ये रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीची सुरूवात एन्व्हॅयरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते फ्लॅग दाखवुन करण्यात आली. या रॅली मध्ये स्री भ्रुणहत्या करू का ,बेट बचाव पर प्रबोधनात्मक घोष वाक्यांनी परिसर दुमदुमला होता.