कोरोनाच्या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये वेबिनारच्या माध्यमातून ज्ञानाची व माहितीची शिदोरी वाटणाऱ्या सुनेत्रावहिनी पवार व एन्व्हायरमेंटल फोरमचे मनापासून आभार व कौतुक. मार्च 2020 पासून देशात कोरोनामुळे सर्व गोष्टींना मर्यादा आल्या. तसेच लोक आरोग्यापासून ते आर्थिक गोष्टींपर्यंत सर्वच बाबींवर चिंताग्रस्त झाले . कोरोनाच्या आलेल्या परिस्थितीत बंद घरा - दारात राहूनसुद्धा आपण इतरांसाठी ज्ञानाचे व माहितीचे दरवाजे विविध माध्यमातून खुले केले पाहिजेत, या विचारातून वेबीनारचे आयोजन करून सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टीम एन्व्हायरमेंटल फोरम कार्यरत झाली. त्यांनी विविध विषयांवर अनेक नामवंत तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली . एक वर्षापेक्षा जास्त काळ अखंडपणे, अविरतपणे व सातत्यपूर्ण पद्धतीने प्रत्येक शनिवारी आयोजित होणाऱ्या या वेबिनारचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. *वेबिनारचे तब्बल 58 पुष्प गुंफले जाणे ही बाब छोटी नाही. याचे श्रेय आदरणीय वहिनीसाहेब आपणास जाते . पर्यावरणीय विषयांबरोबरच इतिहासाचा सिल्क मार्ग ते कोरोनातील आरोग्य कसे जपावे इथपर्यंत विविध विषयांना स्पर्श करीत ही वेबिनार सिरीज आता वेगळ्या उंचीवर गेली आहे . आपण सुरुवात केलेली ज्ञानाच्या खजिन्याची ही शिदोरी दिवसेंदिवस अशीच वृद्धिंगत होत राहील व आपल्या उत्तम नियोजनामुळे / विचारांमुळे इतरांच्या ज्ञानात - माहितीत भर पडत राहील हे नक्की . कोरोनाच्या निराशावादी कालखंडात कार्य करीत रहा असा ' आशावादी ' संदेश वेबिनारच्या माध्यमातून कृतीमय पद्धतीने दिल्याबद्दल पुनश्च एकदा आदरणीय वहिनीसाहेब आपले मनापासून खूप खूप आभार . श्री.योगेश पाटील...