आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात साजरा करण्यात आला. दहावीच्या CISCE -ICSE (Std.X) बोर्ड परिक्षेत भारता मध्ये तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्या प्रतिष्ठानच्या मगरपट्टा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी भार्गव कोल्लापल्ले याला आजच्या ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. याप्रसंगी बोलताना संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच आपण सर्वांनी निष्ठापूर्वक विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून देशाच्या उज्ज्वल वाटचालीसाठी योगदान देण्याचं आवाहनही यावेळी केलं..