महिला स्वावलंबनाच्या उद्देशानं उभारलेल्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कमध्ये आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना बारामतीत टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचं काम निरंतरपणे होत असल्याची बाब समाधान देणारी आहे. आज या निमित्ताने देशासाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचाही गौरव करण्यात आला.