बारामतीत विद्या प्रतिष्ठान व एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने कार्यशाळा संपन्न... विद्या प्रतिष्ठान आणि एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने थिएटर इन एज्युकेशन या विषयावर कार्यशाळेचे गुरुवारी व्हि आय आय टी काॅलेज विद्या नगरी येथे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध मार्गदर्शक राधिका इंगळे यांनी या कार्यशाळेमध्ये शिक्षकांना दिवसभर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत बारामती मधील 26 हून अधिक शाळांच्या शिक्षकांनी सहभाग घेतला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना, तसेच कलाक्षेत्रात विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार व सचिव अँड. नीलिमा गुजर यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन केले गेले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करताना किंवा नाटक एकपात्री प्रयोग किंवा गायनाचे कार्यक्रम सादर करताना कशाप्रकारे ते सादरीकरण व्हावे, त्यामध्ये काय काळजी घ्यायला हवी, याबाबतचे परिपूर्ण मार्गदर्शन राधिका इंगळे यांनी या कार्यशाळेत केले. कला शिक्षकांच्या शंकांचेही त्यांनी याप्रसंगी निरसन केले. या कार्यशाळेमध्ये राधा कोरे, ज्योती जगताप, यशस्विनी निगडे, जॉयसी जोसेफ, कल्पना बारवकर, आनंद देशमुख आदी उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानचे रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले. संस्थेचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, किरण गुजर, यांनी सहकार्य केले.